आरामखुर्ची आणि प्रयोगशाळा
श्रद्धा, मूल्ये, कर्मकांडे, परंपरा यांचे मूळ व कूळ शोधणे त्यातून ज्ञानाची निर्मिती करणे ही विश्लेषणात्मक फिलॉसॉफीची पद्धती आहे. (पाश्चात्त्य तत्त्वज्ञान या अर्थाने फिलॉसॉफी हाच शब्द सोयीसाठी लेखभर वापरला आहे). फिलॉसॉफीच्या विश्लेषणाच्या पद्धती विकसित होऊ लागल्यामुळे फिलॉसॉफी मानव्यविद्यांपासून दूर जाऊ लागली. संस्कृती व इतिहास यांतून फिलॉसॉफीचा उगम झालेला आहे. या उगमाचा फिलॉसॉफीला विसर पडला की काय …